Should I give up my nature – Ramakrishna Paramahansa

Once Ramakrishna Paramahansa was walking along with some of his disciples across the river. He saw a scorpion floating on the surface in the river, struggling to survive; it must have been struggling there for some time, so it was trying to get out of there desperately, but in vain, as it was not able to successfully cross the river.

When Ramakrishna saw this little creature struggling so hard, his heart melted, he ran into the water and lifted the scorpion, the scorpion which was already scared to death stung him in its fear.

Ramakrishna suddenly shook his hand in pain and dropped the scorpion. The scorpion fell back into the river and once again started to swim desperately. Ramakrishna lifted it again with his hand off the river and ran towards the edge of the river to save it, the scorpion stung him again in its confused state. This time he found a twig floating in the water and carefully moved the scorpion to the edge off the water.
One of the disciples who were watching all this happening asked his Guru ‘O Master! Why did you lift it the second time? Even after it stung you causing so much pain?’

The Guru replied ‘It is the nature of the scorpion, it will sting us when it is scared. It was struggling, it was in pain; it is my nature to help it. Should I give up my nature Just because it stung me ?’ No.

Note : – I got this article here

मी अनुभवलेला धर्म

*मी अनुभवलेला धर्म *
(शब्दांकन :-राम देशमुख पार्डीकर)
मी गेल्या वर्षी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो.
जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच.
पुण्याजवळ रात्री मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो.
काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या
आडोश्याला झोपण्यासाठी गेले पण त्या इमारतीतल्या
सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी त्यांना हाकलून लावले.
दुस-या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणा-या एका जंगलात पडला, आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो.
एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली.
झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळसारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खुपच खुजा वाटत होता.
चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते.
त्या बांधवाकडे पाणी मागितले पण पाणी थोडे अन आम्ही 25 जन, शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले.
पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच पण तरीही तो माणूस हेलपाटे
मारत होता.
अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले, ” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “.
यावर तो आदिवासी म्हणाला “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “.
तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला.
रात्र भर झोप लागली नाही. मन स्वताला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा
आदीवासी म्हणतो तो धर्म कोणता?
आम्ही ज्याच्या घोषणा
देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणा-याचा धर्म कोणता ?
मन प्रश्नांनी भरून गेले होते.
नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की आदिवासी म्हणतो तो?
जशी रात्र उतरत होती तसा
मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या
दिवशी खरा धर्म गवसला होता.
हातातली पोळी कुत्र्याने
पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते.
कुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता.
आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुस-या
धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुस-या धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता ते शत्रू वाटत होते पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली.
त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वतालाच स्वताची लाज
वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. दगडू कचरे त्याचे नांव.
तिथून निघताना त्याच्या पायाला स्पर्श केला खूप
काहीतरी गवसल्याचा आनंद मनात दाटला होता.

माणसाला माणसाचे शत्रू बनवणारा, परस्पराच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?

शहरी ढोंगि माणसा माणुस महणुन विचार कर.

Life

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या  व्यक्तीबाबत चांगले वा वाईट  मत बनवण्यापेक्षा,
आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी  संवाद साधुन मगच खात्री  करा.

नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे …
बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.

कारण..    पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे  नाही.
.आणि
वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास  येतात आणि झऱ्यावर  राजहंस!!

निवड आपली आहे..

कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्…
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

अगर …

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !
तो जितने वाला भी
जीत की खुशी खो देता हैं।
ये है मुस्कान की ताकत …

जपून टाक पाउल … इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास … इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय …इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा  मागतात, त्यांची चुक असते  म्हणून नव्हे,
तर त्यांना  आपल्या माणसांची पर्वा  असते म्हणून..

जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे  काही देणे लागतात म्हणून  नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन……!

मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..

म्हणुन आनंदी रहा

आधी काळजात रेंज पाहीजे

आधी काळजात रेंज पाहीजे …

तेच तेच जगणं
तेच तेच जिवन
रोज रोज तेच
सारख सारख जेवण.
आयुष्यात कधी कधी थोडातरी
चेंज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे…..

भाऊ भाऊ दुर झाले
आईबापाच ओझं झालं,
अर्ध अंगण तुझ अन्
अर्ध अंगण माझ झालं.
थोडतरी काळजात आपुलकिचं
कव्हरेज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे….

हल्ली घरातल्या घरात
अंगत पंगत बसत नाही
आपुलकी प्रेम जिव्हाळा
दुरदुर दिसत नाही.
घराघरात प्रत्येकाला
आयुष्य अँरेंज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे….

ऐकमेकांचं सुखदुःख
ऐकमेकांनीच वाटायचं
आपुलकीनं मायेनं
ऐकमेकांना भेटायचं.
एकत्र पंगतीत जेवतांनाही
शेतातलं ताजे व्हेज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहिजे !!

Marathi poem

आर्थिक स्टॅबिलिटी मिळवताना
बरच गणित चुकत जातं,
नसण्यातच आनंद असतो
शेवटी उत्तर हाती येतं…

लहानपणी शाळेमध्ये
एकच ‘पोशाख’ असायचा
खाकी चड्डी पांढरा सदरा
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा…

पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची,
गावात एखाद्याकडेच
‘बाटाची’ चप्पल दिसायची…

राशनच्या दुकानावर
लोकं चकरा मारायचे
तवा कुठं वायरच्या पिशवीत
किलोभर साखर आणायचे…

खालच्या वर्गातून वर जाताना
पुस्तक जुनेच असायचे,
‘शुभंकरोती’आणि ‘बे एक बे’
घरोघरी पोर म्हणायचे…

सडा,सारवण,धुणं,भांडी
बायकांना तर आरामच नव्हता
ज्याच्याकडे ‘पाणी तापवायचा बंब ‘
तोच सगळ्यात श्रीमंत होता…

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं,
खऊट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाच तेल असायचं…

कशाचा ‘मोती’ साबण
अन कशाची ‘काजू कतली’?
माया, प्रेम एवढ होतं
की गोड लागायची वात्तड चकली…

भात, पोळी ,गोडधोड
सणासुदीला व्हायचे
पाहुण्याला गरम आणि
घरच्याला गार पोळी वाढायचे…

पिझ्झा ,बर्गर ,न्यूडल्स
आजकाल रूटीन असतं
गरीबीला लपवणं
फार कठिण असतं…

स्वयंपाक घरात आता सगळा
किराणा भरलेला असतो,
खाऊ घालायची वासनाच नाही
लोणच्याला बुरा दिसतो…

हल्ली आता प्रत्येकाचं
पॅकेज फक्त मोठं असतं,
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर “भकास ” दिसतं…

का बर पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?

काय तर म्हणे आम्ही आता
‘हाय फाय’ झालो,
चार पैसे आल्यामुळे
पुरते वाया गेलो…

कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही,
एवढं मात्र खरं की
सुखं मिळंत नाही…

प्रगती झाली का अधोगती
काहीच कळेना?
कोणाला कोणाकडून
अजिबात प्रेम मिळेना…

अहंकार कुरवाळल्यामुळे
प्रेमाचे झरे आटायलेत
आणि आधार गमावल्यामुळं
” सायकियाट्रिक ” जवळचे वाटायलेत…

भ्रमामध्ये राहू नका
जागं व्हा थोडं,
नात्यांशिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं……….
(संकलित)

Look at yourself through another angle…..

Why? You want to know… Another purpose of this is well explained below:

A cobbler lived in a large village and he was the only cobbler in town, so he was responsible for repairing the boots of everybody else. However, he didn’t have time to repair his own boots. This wasn’t a problem at first, but over time, his boots began to deteriorate and fall apart. While he worked feverishly on the boots of everyone else, his feet got blisters and he started to limp. His customers started to worry about him, but he reassured them that everything was ok. However, after a few years, the cobbler’s feet were so injured that he could no longer work and no-one’s boots got repaired. As a consequence, soon the entire town started to limp in pain, all because the cobbler never took the time to repair his own boots.
This simple principle is so often disregarded. If you don’t look after yourself, after a while you’ll be no good to anyone else either. Your best intentions will mean nothing and you’ll be unable to do what you’re meant to do. This goes for leaders, social workers, teachers advocates even parents.
If you don’t take the time to care for yourself, no-one else will.
Are you taking care of yourself ?


Have a good time ahead and kindly take care of yourself.

Thoughts worth reading

WhatsApp status messages worth taking seriously

1. Let your work speak for itself. – (तुम्ही काही बोलण्यापेक्षा तुमचे काम तुमच्यासाठी बोलू दे.)

2. Time, you can’t keep it, but you can spend it. – (वेळ तुम्ही राखून ठेवू शकत नाही, परंतु वापरू शकता.)

3. Everything in your life is a reflection of a choice you have made. If you want a different result, make a different choice. – (तुम्ही केलेल्या प्रत्येक निवडीचे प्रतिबिंब तुमचे जीवन आहे. तुम्हाला वेगळे परिणाम हवे असतील तर वेगळी निवड करा.)

4. Life consists not in holding good cards but in playing those you hold well. – (जीवन हे फक्त तुमच्याकडे चांगल्या गोष्टी असण्यात नसून तुमच्याकडे जे काही आहे त्यातून चांगले घडविण्यात आहे.)

5. Destiny is a matter of choice, not a chance. It’s not expected, but created. – (नशीब ही बाब निवडीची असून, संधीची नाही. तिची अपेक्षा करता येत नाही तर ती घडवावी लागते.)

6. The less you respond to negative people, the more peaceful your life will become. – (नकारात्मक लोकांना तुम्ही जेवढे कमी प्रतिसाद द्याल, तेवढे तुमचे जीवन शांततापूर्ण होईल.)

7. Hard work is never lost. – (कष्ट केलेले कधीही वाया जात नाही.)

8. Wrinkles are the lines of life on the face. – (चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या जीवनाच्या ओळी आहेत.)

9. Goals are what give meaning to life. – (उद्दिष्टांमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो.)

10. Life is not about finding yourself. Life is about creating yourself. – (जीवन हे स्वतः ला शोधण्यात नसून स्वतःला घडविण्यात आहे.)

11. The people who do not appreciate the little things of life, are not worth the big ones. – (जे लोक जीवनातील लहान गोष्टींची कदर करीत नाहीत, मोठ्या गोष्टींसाठी ते पात्र नाहीत.)

Sairat

Received from my Facebook friend…….

Think over……

सैराट सुटलेल्या पिढीला
गरज आहे संस्काराची
टाईमपास साठी आयुष्य नाही
हे कान धरून सांगायची

बालक पालकच जेव्हा
नको ते पाहतात
अभिव्यक्तीच्या नावाखाली
मूल्ये पायदळी तुडवतात

आयुष्याचा सिनेमा होतोय
ध्यानी कुणी घेत नाही
पुरस्काराच्या लेबलवर
सार काही खपून जाई

तुमचा होतो खेळ
पण आमचा जीव जातो
मिसरूड फुटण्याआधी
पोरगा जीव देतो

क्रांतिगीते ज्यांनी गावीत
ती झिंगाटवर नाचतात
देशासाठी ज्यांनी मरावं
ती पोरीवर मरतात

नवसाच्या लेकी
फँड्री मागे उधळतात
माकडाच्या हाती
मोती अलगद लागतात

प्रेम हेच जगणं
प्रेम हेच मरणं
प्रेमासाठी आईबापाचं
तोंड काळ करणं

म्हणे आम्ही सुधारलो
संगणक युगात आलो
कमरेचे सोडून डोक्याला
हेच सांगू लागलो

आग लागली दुसरीकडे
या भ्रमात राहू नका
घरातल्या तरूणाईकडे
दुर्लक्ष मात्र करू नका

ज्या त्या वयात
हे सार शोभून दिसतं
आजकाल मात्र
कळीआधीच फूल उमलतं

आपल्या संस्कृतीचे
ठेवा जरा भान
उगाचच सैराटच
उठवू नका रान ●●●●

Points to think about

एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच . मार्च एंड असल्यामुळे इनकम ट्एक्स भरणे भाग होते . घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते .
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती .
जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती . तिने मुलीला विचारले .
मुलगी म्हणाली ” आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे ‘negative thanks giving ‘ .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात ”
आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली . बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय
मुलीने लिहीलं होतं
– मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..
– मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.
– मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते .
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या
” income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे .”
” घरी भरपूर काम कराव लागत म्हणजेच माझ्याकडे एक घर , एक हक्काचे आश्रयस्थान आहे ..”
” सणासूदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत .”
गोष्टीचे तात्पर्य
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..
चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.

Never give Up

ज्याने रचना केली त्याला सलाम

👍👍👍🙏👌👌👌

घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?

कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊

फक्त हिमतीने लढ👊