Sairat

Received from my Facebook friend…….

Think over……

सैराट सुटलेल्या पिढीला
गरज आहे संस्काराची
टाईमपास साठी आयुष्य नाही
हे कान धरून सांगायची

बालक पालकच जेव्हा
नको ते पाहतात
अभिव्यक्तीच्या नावाखाली
मूल्ये पायदळी तुडवतात

आयुष्याचा सिनेमा होतोय
ध्यानी कुणी घेत नाही
पुरस्काराच्या लेबलवर
सार काही खपून जाई

तुमचा होतो खेळ
पण आमचा जीव जातो
मिसरूड फुटण्याआधी
पोरगा जीव देतो

क्रांतिगीते ज्यांनी गावीत
ती झिंगाटवर नाचतात
देशासाठी ज्यांनी मरावं
ती पोरीवर मरतात

नवसाच्या लेकी
फँड्री मागे उधळतात
माकडाच्या हाती
मोती अलगद लागतात

प्रेम हेच जगणं
प्रेम हेच मरणं
प्रेमासाठी आईबापाचं
तोंड काळ करणं

म्हणे आम्ही सुधारलो
संगणक युगात आलो
कमरेचे सोडून डोक्याला
हेच सांगू लागलो

आग लागली दुसरीकडे
या भ्रमात राहू नका
घरातल्या तरूणाईकडे
दुर्लक्ष मात्र करू नका

ज्या त्या वयात
हे सार शोभून दिसतं
आजकाल मात्र
कळीआधीच फूल उमलतं

आपल्या संस्कृतीचे
ठेवा जरा भान
उगाचच सैराटच
उठवू नका रान ●●●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *