Amitabh Bachchan – प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व




बच्चन, अमिताभ : (११ ऑक्टोबर १९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे.
त्यांचे वडील _ हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील ख्यातनामकवी होते.
त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन.
अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण
नैनितालच्याशेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून
त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली.
त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकातायेथे एका कंपनीत काम केले.
नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी (१९६९) या चित्रपटातसर्वप्रथम भूमिका मिळाली.
त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद (१९७१) या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार कलाकार राजेश खन्ना
यांच्या समवेत काम करण्याचीत्यांना संधी मिळाली.
त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला.
नमकहराम (१९७२, दिग्द.हृषीकेश मुखर्जी) या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली.
त्या पाठोपाठ आलेला जंजीर (१९७३, दिग्द. प्रकाश मेहरा) चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची
त्यांची भूमिकाविशेष गाजली आणि येथूनच त्यांची संतप्त तरुणाची (अंग्री यंग मॅन) प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली.
प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्यासंतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर
आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे,
भारदस्त घनगंभीरआवाज आणि
गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ (अभिनय सम्राट) पदावर पोचले व रूपेरी पडद्यावरजणू अमिताभ युग सुरू झाले.
आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात
भारतातील सर्वाधिक मानधनघेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट
आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता.
आतापर्यंत त्यांनीसुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा,
यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी,
लोकप्रियचित्रपटांत अभिमान (१९७३, दिग्द. हृषिकेश मुखर्जी), दीवार (१९७५, दिग्द. यश चोप्रा),
शोले (१९७५, दिग्द. रमेश सिप्पी), कभी कभी (१९७६, दिग्द. यश चोप्रा),
अमर अकबर अँथनी(१९७६, दिग्द. मनमोहन देसाई), मुकद्दर का सिकंदर (१९७८, दिग्द. प्रकाश मेहरा),
त्रिशूल (१९७८, दिग्द. यश चोप्रा), डॉन (१९७८, दिग्द. चंद्रा बारोट), काला पत्थर (१९७९, दिग्द. यशचोप्रा),
नसीब (१९८०, दिग्द. मनमोहन देसाई), लावारीस (१९८१, दिग्द. प्रकाश मेहरा), सिलसिला (१९८१, दिग्द. यश चोप्रा),
नमकहलाल (१९८२, दिग्द. प्रकाश मेहरा), कुली (१९८३, दिग्द. मनमोहन देसाई), शराबी (१९८४, दिग्द. प्रकाश मेहरा),
अग्निपथ (१९९०,दिग्द. मुकुल आनंद) यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी
त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाजहे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी
भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजातपार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम (१९६९, दिग्द. मृणाल सेन), शतरंज के खिलाडी (१९७८, दिग्द. सत्यजित रे),
लगान (दिग्द. आशुतोष गोवारीकर) आदी चित्रपटांचाउल्लेख करता येईल.
ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन (भादुरी) या त्यांच्या पत्नी होत. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हेही हिंदी चित्रपटसृष्टीतीलआघाडीचे सुप्रसिद्ध कलावंत होत.




१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले.
राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही.तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजिनामा दिला.
त्यांच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे, १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघातझाल्याने
त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून,
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण याकिताबांनी गौरविले आहे.
या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.
विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत.
त्यांनी १९९६ मध्ये ‘ए बी सी एल्’ (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि.) ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती.
आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली.
२००० मध्ये’कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली.
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्शवस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला.
आजही ही मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय व
वाहिन्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळवूनदेणारी मालिका म्हणून ओळखली जाते.
प्रारंभी स्टार टीव्हीवर व नंतर सोनी टीव्हीवर ही मालिका आजही सुरू आहे. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी
आपल्या भूमिकांचा बाजबदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो.
मोहब्बते (२०००),
कभी खुशी कभी गम (२००१), बागबान (२००३), ब्लॅक (२००५), सरकारराज (२००८), पा (२००९) इ. चित्रपटांचा
या संदर्भात उल्लेख करता येईल.

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत.
त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.




अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!!!




लहानपणी शाळे मधे
एकच ड्रेस असायचा……
खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा…
👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦
पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची……
गावात एखाद्या कडेच
“बाटाची”चप्पल दिसायची!
👡👡

रेशनच्या दुकानावर
लोकं चकरा मारायचे…..🏃🏼🏃🏿
तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !🚶

वरच्या वर्गात जाताना
पुस्तक जुनेच असायचे 📓
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे !😲🙏

सडा, सारवण, धुणं, भांडी
बायकांना तर आरामच नव्हता😰
ज्याच्याकडे ‘ पाणी तापवायचा बंब ‘तोच सगळ्यात श्रीमंत होता !🤓

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं
खोबर्याच्या तेला मधे
वासाच तेल असायचं !!😙




कुठला मोती साबण
अन कशाची काजू कतली 🍕
माया, प्रेम एवढं होतं की
गोड लागायची वातड चकली !!🤗

भात, पोळी , गोडधोड
सणासुदिलाच व्हायचे
पाहुण्याला गरम आणि
घरच्याला गार पोळी वाढायचे !😌

पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स आजकाल रूटीन असतं🍵🍝🍲
गरीबीला लपवणं
फारच कठिण असतं

स्वयंपाक घरात आता भरपूर
किराणा भरलेला असतो 🍎🍇🍌
खाऊ घालायची वासनाच नाही
म्हणून लोणच्याला भुरा येतो?

हल्ली आता प्रत्येकाच्ं
पैकेज फक्त मोठ्ठ असतं 💰
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर “भकास ” वाटतं ?🏠

का बरे पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत?🤔
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?
😉😆😅😂?🗣

काय तर म्हणे आम्ही आता
हाय फाय झालो !
चार पैसे आल्यामूळे, खरंतर
सगळेच पुरते वाया गेलो !!

कशामुळे घात झाला
काहीच का कळंत नाही ?
एवढं मात्र खरं की
पहिल्यासारखं
सुख आता अजिबात मिळत नाही !?😪

प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना !??
माणसाला माणसा कडून
अजिबात प्रेम मिळेना ?💔

अहंकार कुरवाळल्याने
प्रेमाचे झरे आटलेत
अन् आधार गमावल्यामुळें
” सायकियाट्रिक ” जवळचे झालेत !!?

भ्रमामध्ये राहु नका
जागं व्हा थोडं
माणसा शिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं!
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत,,,
👏👏👏👏👏👏👏👏 अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण




अप्रूप …..जुन्या आठवणी





परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो … फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ….. तीच पूर्वीची
जागा .. कपाटही तेच असावं बहुधा …. पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं …. सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल … पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला … आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ……. शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात .

कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं …. ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही…….पण ….

पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड …. त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार …. आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान …. अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो … आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो …… जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे … एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये . अप्रूप ………..खरंच… सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता …… पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं…




खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप …..
तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप……
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप…..
धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप…..
Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप….
हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप……
स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप….
gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप….आणि बरंच काही…

आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” …

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं … मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो … बाहेर एक मित्र भेटला …. घाईत होता … त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता …..

क्षितिज दाते