One of the best Whats App message
एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.

पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो…. वाघ जोरात झेप घेतो… आणि तितक्यात वीज चमकते… त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं… आणि ती गोळी त्या वाघाला लागते…वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो… त्यामुळे वणवाही विझतो…

आणि

या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते…

माणसाचं आयुष्य हे असंच असतं…

त्याच्या हातात काहीच नसतं…

आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची…

कर्ता करविता असतो तो ईश्वर…

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही…

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच…

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं…

‘Behind every misfortune there is a crime… But behind every crime there is a misfortune…!’

आयुष्य हे असंच असतं… कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं… दोन्ही एकाच रथाची चाकं…

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच…

‘समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला’…पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

‘चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं’…

त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

‘नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.’ तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो… पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो… त्यामुळे तो वाचतो…

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही…
हे असंच असतं… भक्तीने रुजवलेलं … प्रेमाने सावरलेलं… आसक्तीने बुडवलेलं… कर्माच्या चक्रात अडकलेलं… ईश्वराने लिहीलेलं … आपलं आयुष्यं…!

मोर नाचताना सुद्धा रडतो… आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही… आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते…!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका…..
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका…..
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे…..
– कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही…….
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस……
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं……

-स्वामी विवेकानंद
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *