!! विसंगती !!

चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर
फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात
नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी
“खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं
आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.
सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो.
– पु. ल. देशपांडे 😊

It's only fair to share...Email this to someoneShare on FacebookShare on Google+Tweet about this on TwitterShare on LinkedIn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *