असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा
✍🏻आई झाल्यावर , मुली
तुला आईपणाचे भान येऊ दे
एकत्रित कुटुंबाचे संस्कार
तुझ्या बाळांच्या मनावर होऊ
दे✍🏻

✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून
अलिप्त संसार थाटू नको
स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने
सासरच्या नात्यास छाटू नको✍🏻

✍🏻सासूशी उडणाऱ्या खटक्यात
बाळांना उगीच ओढू नको
आजी नातवाच्या नात्यावर
त्याचा राग काढू नको ✍🏻

✍🏻सासऱ्याच्या म्हातारपणावर
रागेवैतागे घसरू नको
नव्या-जुन्या पिढीमधील दुवा
तुच आहे , विसरू नको ✍🏻

✍🏻अगदी सख्या भावासारखं
दिराबरोबर तुझं भांडण होईल
पण तुझ्या लाडक्याना खेळणीही
तोच काका घेऊन येईल✍🏻

✍🏻लहान असो नाहीतर मोठी
नणंद तर चेष्टेने त्रास देणारच
मांडीवर घेत तुझ्या पिलांना
चिऊ काऊचा घास
भरवणारच✍🏻

✍🏻तुझं-माझं भेदभावनेने
जावेच्या पोरांचा द्वेष करू नको
वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना
दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻

✍🏻घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना
द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ?
अग, जशास तसे उत्तर देऊन
एक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻

✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर
सर्वांच्या मनात घर करुन रहाशील
तुझ्या पाखरांची उंच भरारी
तू सर्वाबरोबर आनंदात
पहाशील✍🏻

✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर
मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत
आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही
वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *