माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।
बायको म्हणजे कोण असते ?
बायको म्हणजे बायकोच असते .
कधी ती पायात लुडबुडणारी
मांजर असते ,
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते .
कधी ती समजून घेणारी मित्र असते,
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते ,
कधी मस्का लावणारी असते .
कधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते.
कधी न सांगता समजून घेते,
तर कधी गैरसमज करून घेते,
कधी मूलांची काळजी करते,
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते,
कधी नव-याला नावं ठेवते,
कधी नव-याचा पगार वाढवुन सांगते.
कधी फिरायला नेल्यावर नखरे करते,
कधी हट्टाने हौस पुरवून घेते,
कधी हौसेने नवीन पदार्थ
करून खाऊ घालते.
….
कधी शॉपिंगने बेजार करते,
कधी नव-यासाठी कौतुकाने
काहीतरी खरेदी करते,
कधी कोणाची गुपितं सांगते ,
कधी कोणाला कळु न देता
गुपचूप कारभार उरकते.
कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते,
कधी घरी यायची वाट बघत बसते.
कधी सरळ सुत असते ,
तर कधी संशयाचे भूत असते ,
कधी नव-याला लगाम घालु पाहते,
कधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते.
कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते .
कधी न म्हणते—की आज
मी दमले, दोन पेग मारते,
कधी न संपणारी घराची ऊर्जा असते
कितीही भांडली तरी
मुकाटयाने जेवायला घालते.
बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match
म्हणून आपल्याशीच जोडी
लावून दिलेली असते .
म्हणूनच सांगतो मित्राहो—
नल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा.
माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।
बायकाे नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते नवरा नावाच्या
इकडेतिकडे भिरभिरणा-या
फुलपाखराला एकाच
फुलामध्ये गुंतवून ठेवत.
आपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही.
आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहाने तर घरात असतं
पण मनानं ते आपल्याभोवती फिरत असतं.
आपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या ओठावर हसु फुलत नाही आपण आनंदात असताना
या तुफानाचं दु:ख चेह-यावर येत नाही.
थोडक्यात काय तर या तुफानमुळेच
आयुष्यात चैतन्य आहे.
बाहेरच्या तारांकीत जगात
कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां
त्याचं कारण हे तुफानच आहे.
साठीनंतरच्या वयात या
तुफानाचं खरं महत्व समजतं.
सगळं गणगोत विरोधात गेलं
तरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे
तेव्हा या तुफानाला ढेकर येतो.
उतरत्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच ‘तुफान’…!
पाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहीजे.