Steve Jobs Last words




स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द –

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली…
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले…

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं…

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस ‘आतून’ फक्त आणि फक्त पिळवटतच जातो…अगदी माझ्यासारखा…

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच…संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही…केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती…जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा…हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?…”आजारपणाचा बिछाना” …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात…पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपलं आयुष्य”.

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते…ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा…

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका…स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.




Know your Strengths

एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
“नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय.”
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : “बोला”
“काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय.”
बॉस : “मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता”
“तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:”
बॉस : “ओके ओके, या तुम्ही”
***
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
“सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या”
***
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी “स्वरदा” फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
“सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही सावकाश”
***
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
***
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
“सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये”
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी “स्वरदा” उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
“सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर”
****
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : “ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?”
स्वरदा : “मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल”
***
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
“उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक”
**********
डीडी क्लास : आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या “एका” गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल”

देवाशी संवाद ……..फरक फक्त विचारांचा

माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?
देव : विचार ना.
माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव : बरं मग ?
माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव : मग?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

देव : आता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस .

आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. …
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो…..
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र…..

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो…!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच…

आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.

‘माझं’ म्हणून नाही “आपलं” म्हणून जगता आलं पाहिजे …
जग खुप ‘चांगलं’ आहे फक्त चांगलं “वागता” आलं पाहिजे …
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

*बासरी*

खुप सुंदर आहे अवश्य वाचाच..
*बासरी* …

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.

तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.

तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’ गोपी निरुत्तर झाल्यl.

अहंकारहित शरीर ही *श्रीहरीची बासरी

After exam results….

प्रिय आई बाबा ,

बारावीचा निकाल लागला . तुम्ही अनुत्तीर्ण झालात . हो . . तुम्हीच ! वर्षभर सगळ्यांना सांगत होतात न ?? या कार्ट्याची कसली परीक्षा ? परीक्षा तर आमची . . . !! माझे सगळे मित्र , मैत्रिणी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले . कारण परीक्षा त्यांनी दिली होती . घरच्यांनी त्यांना फक्त आधार दिला होता . . आई बाबा हाच आधार ना तुम्ही मला परीक्षेच्या आधी दिलात ना आता देत आहात . . .

तुम्ही म्हणता तुमच्या सर्कल मध्ये तुमची मान माझ्यामुळे खाली गेली . आई तू म्हणतेस माझ्या मूळे तुझी मान खाली गेली . आई बाबा माझे पण एक सर्कल आहे . तुमच्या सारखेच . तिथे माझीही मान खाली गेली आहे याची जाणीव आहे का तुम्हाला ?? ९५ % , ९० % , ८८ % या सगळ्या गराड्यात ७० % टक्क्यांचे तुमचे बाळ एकटे आहे हे तुम्ही ‘नोटीस ‘ केलंय का कधी ??

बाबा दोन चार दिवसांनी माझे मार्क्स हा विषय मागे पडेल . तुम्ही तुमच्या सर्कल मध्ये रमाल . आई तुझ्या ग्रुप मधली गॉसिप संपली की एका किटी पार्टी नंतर तू तुझ्या सर्कल मध्ये बिझी होशील . अचानक मी या ‘मार्क ‘ वाल्यांपासून वेगळा होतोय माझे सर्कलच नाहीसे होतंय हे तुम्हाला कसे समजत नाहीये ?? अचानक सगळे मार्कवाले एकत्र झालेत आणि मी त्यांच्यात असून पण एकटा पडलोय कारण यापुढे त्यांच्या वाटा आणि विषय हे माझ्या पेक्षा वेगळे आहेत . . तुम्हाला कधीच समजून घ्यावसं वाटत नाही ?

गेले २ दिवस आपण बोलत नाही आहोत . . . माझ्या कमी मार्कांनी आपल्यात खूप दुरावा निर्माण केलाय . तुमच्या पेक्षा किंवा तुमच्या पेक्षा जास्ती स्वप्ने मीही पाहीली होती . अभ्यास केला होता , पण नाही पडले मार्क . . . तुमच्या लेखी ७० % म्हणजे अनुत्तीर्ण ना ? हो मी फेल आहे . . . गुण पत्रिकेत ७० % पडण्य पेक्षा तुमच्या नजरेत माझी झालेली शून्य किंमत मला जास्ती टोचते . . . हे तुम्हाला कधी कळेल ?? रागाने तुम्ही माझ्या ११-१२ वी साठी झालेल्या खर्चाचा हिशेब माझ्यासमोर टाकून या मार्कांसाठी ओतला का इतका पैसा म्हणून जाब विचारलात . . . या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ ??

आई बाबा मला मार्क कमी पडले याचे दुक्ख , गिल्ट मला तुमच्या पेक्षा जास्ती आहे . . मी एकटेपणात आणि या गिल्ट मध्ये गुरफटत आहे . . मला जवळ घेऊन बाळ का कमी मार्क पडले असं विचाराल का ?? मला खूप रडायचं आहे . . . मला थोडं जवळ घ्याल का ?? आज मला मार्क कमी पडलेत म्हणून माझा वाटणारा तिटकारा , घरी होणारी धुसफूस , टोमणे यातून आपण एकमेकांपासून किति दूर जात आहोत . . .

कालांतराने १२ चे मार्क मागे पडतील . पण या प्रसंगात आलेली कटुता मागे पडेल का आई ?? ज्या वेळी मला तुमची सगळ्यात गरज आहे तेव्हा मला तुम्ही कोठेच दिसत नाही आहात . . . अशा वेळी मला आपल्या कामवाली च्या मुलाचे कौतुक वाटते . बिचारी प्वार फास झालं म्हणून पेढे द्यायला येते . . . बाबा तुमच्या माझ्या मधलं नातं या टक्क्यांवर आधारित आहे का ??

Just think about it…..

रागाला योग्य दिशा दिली तर….

रागावरती नियंत्रण करण्यास एक सुंदर उदाहरण —-
एका वकीलाच्या ऑफीसमध्ये संवाद –
“नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.. सगळ्या च जमीनीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?
मी त्यांना बसायला सांगितल. ते
खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपञे तपासली. त्यांच्याकडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं. मी अजून कागदपञे पाहतो. तुमच्या केसचा विचार करूया. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.
४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता.मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.
मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपञे पाहीली.
तुंम्ही दोघे भाव. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाव M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. रानात लंगोटीवर राबला. नेव्रा दाजीच्या हीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात च-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. चड्डी रक्तबंबाळ झाली. तुंम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं. खर म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळत वय नव्हत….फक्त कळती माया होती.. आई बापाच्या मागं यांचा मीच आई बाप ही भावना होती…
तुमचा भाव B.A ला गेला. उर भरून आला. तुंम्ही पुंन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा ञास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं..पण गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
हापीसर झाल्यावर खुप फिरायच आहे..नोकरी करायची आहे..तुला आमच्यापेक्षा लय ञास.. आंम्ही रानातली माणसं. आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय.तुंम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.
भाव M.A ला गेला. होस्टेलवर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला.. पोळ्यांचा डबा द्यावा..घरापासून हॉस्टेलच अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली.. तुंम्ही गावात साखर वाटली..
३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केल. तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..
भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायकापोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटच….
लग्न झाल्यापासुन भाव घरी येत नाही..बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय.. घरी पैसा देत नाही..विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे.. गेल्यावर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय..
सगळ सांगून झाल्यावर मी थोडावेळ थांबलो.
नंतर म्हणालो …आता तुमचं म्हणण आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा ?
तो पटकन म्हणाला; हो बरोबर…
मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सापण मिळेल. पण……
पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुंम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्यपण परत मिळणार नाही..आणि मला वाटतयं या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला..तुंम्ही दिलदार होता.. दिलदारच रहा.. तुंम्हाला काहीएक कमी पडणार नाही.. उलट मी म्हणेन वडीलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा..त्याचा हिस्सा पडीक राहुद्या.. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा..शिकुन तुमचा भाव बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत..
त्यान १० मिनीटं विचार केला.. सगळी कागद पिशवीत कोंबली.. डोळं पुसत म्हणाला; चलतो सायेब..
या गोष्टीला ५ वषॅ झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसलीतरी पिशवी.मी म्हणल बसा..तो म्हणाला , ‘बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय’.
हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. काल आलाय. आता गावात ३ मजली घर हाय. ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागु नका.
मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली..
मला भरुन आलं… हातातला पेढा हातातच राहीला…”
रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायचि वेळ येणार नाही.

 

One more what’s up post…………….

Again not sure about the person who wrote it. Salute to that writer….

 

 

Enjoy Life every day and every time

आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही.! मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसुन खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.
आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.! तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाने आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.
जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैशे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैशे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते.
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल.
म्हणूनच म्हणतो नं..
“आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो,
पण माथ्या आड गेलेला “जिवलग”
परत कधीच दिसत नाही” ………..
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.

 

Not sure about original writer